माझी शाळा

   

         माझी शाळा
 *ज्ञानरनावादी शाळा*
 जसा फुलतो फुलांचा मळा
 तशी माझी ज्ञानरनावादी शाळा॥धृ॥

 दगड, गोटे आणि चिंचोके
 करा तुम्ही सगळे गोळा
 बेरीज, वजाबाकी करूनी
 लावा गणिताशी लळा
 *होय, जसा फुलतो फुलांचा मळा*
 *तशी माझी ज्ञानरनावादी शाळा*

इतिहास, भाषा वा गणित असो
ज्ञान मिळवा कृतीतून
मुळीच नसते  घोकंपट्टी
ज्ञान उतरेल मुलांच्या गळा
*होय, जसा फुलतो फुलांचा मळा*
*तशी माझी ज्ञानरनावादी शाळा**

 सृजनशीलतेला मिळतो वाव
 कल्पनाशक्तीला भारीच भाव
 इथे होतात साहित्य गोळा
 उपक्रमांचा तर भारीच मेळा
 *होय, जसा फुलतो फुलांचा मळा*
 *तशी माझी ज्ञानरनावादी शाळा*

नाही बसणार छडी छमछम
ज्ञानाचा सुवास घमघम
इथे असतो एकच नियम
हसा , खेळा पण शिस्त पाळा
*होय, जसा फुलतो फुलांचा मळा*
*तशी माझी ज्ञानरनावादी शाळा*

No comments: