भाषिक खेळ
🔷मध्ये 'ळ' येणारे शब्द सांगा🔷
*_```यामध्ये मुलांनी तीन अक्षरी असे अर्थपूर्ण शब्द सांगायचे ज्याचे मधले अक्षर 'ळ' असेल.```_*
जसे: पळस, तुळस, हळद, टाळणे, वाळणे, जुळणे, मिळणे, जाळणे, रुळणे इ.
🔷दोन अक्षरी असा अर्थपूर्ण शब्द सांगणे व त्या शब्दाच्या दुसऱ्या अक्षराला 'इ' वा 'ई' कार दिल्यास नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतो.🔷
*_``` यात मुले दोन अक्षरी अर्थपूर्ण शब्दाला वेलांटी देऊन नवीन अर्थपूर्ण शब्द सांगतात.```_*
जसे:वाट- वाटी, ताट-ताटी, भाज-भाजी, वार- वारी, वर- वरी, घर- घरी, दर- दरी, सर- सरी, कर- करी, टाळ-टाळी, वेळ- वेळी इ.
🔷 अक्षराचा उलट क्रम 🔷
*_``` यात मुलांनी दोन वा तीन अक्षरी असा अर्थपूर्ण शब्द सांगायचा तो उलट केला असता नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होईल.```_*
जसे: पाटी- टीपा, वार-रवा, सर-रस, वात- तवा, कान- नका, राम- मरा, रम-मर, ठसा- साठ, गर- रग,सखा-खास इ.
🔷दोन अक्षरी शब्दाच्या दुसऱ्या अक्षराला काना देऊन शब्द बनविणे🔷
*_``` यामध्ये दोन अक्षरी व शब्दाचे शेवटचे अक्षर 'अकारी' असेल असा शब्द मुलांनी निवडायचा व त्याच्या दुसऱ्या अक्षरास काना देऊन अर्थपूर्ण दुसरा शब्द बनवायचा.```_*
जसे- गार- गारा, वार- वारा, चुन- चुना, वाफ- वाफा, टाक- टाका, वाट-वाटा, वस- वसा, गीत- गीता, तार-तारा इ.
🔷दोन अक्षरी शब्दाच्या पहिल्या अक्षरावर अनुस्वार देऊन अर्थपूर्ण शब्द बनविणे🔷
*_``` यात मुलांनी दोन अक्षरी असा अर्थपूर्ण शब्द निवडायचा त्याच्या पहिल्या अक्षरावर अनुस्वार दिल्यास दुसरा अर्थपूर्ण शब्द तयार होईल.```_*
जसे:नदी- नंदी, आबा- आंबा, जग-जंग, वाग- वांग, पथ-पंथ, रग- रंग,इ.
यावरून तुम्हाला याप्रकारचे विविध खेळ सुचतील.
*हा खेळ कसा घ्यावा?*
👉 मुलांचे गट पाडावे.
👉 प्रत्येक खेळाच्या पाच फेऱ्या घ्याव्यात.
👉 अचूक शब्द सांगितल्यास 10 गुण द्यावे.
👉शब्द चुकल्यास -5 गुण द्यावे.
अशाप्रकारे जो गट सर्वात जास्त गुण मिळवेल त्या गटाला *'शब्दसम्राट'* म्हणून गौरविण्यात यावे.

No comments:
Post a Comment