माझी शाळा माझे उपक्रम

*कितीही अंकी संख्येचा सराव घ्या अगदी सहज सुलभ व आकर्षक पद्धतीने ...*

*आपल्याला मुलांना संख्या शिकवत असताना थोड्या फार अडचणी जाणवतात.*


*त्या अडचणी समजून घेऊन आपण त्यावर उपाय शोधून त्यांना सोप्या वाटणाऱ्या पद्धतीने शिकऊ या.*

*या शैक्षणिक साहित्यद्वारे आपण मुलांना 0 पासून ते 999 पर्यंत संख्या ओळख व संख्या ज्ञान देऊ शकतो.*


*शतक दशक व एकक हे हि समजावून सांगू शकतो.........*

*(जितके चक्र तितकी अंकी संख्या तयार होते..*
*क्रमाने एक एक वर्तुळ वाढवावे व अमर्यादित संख्यावाचन लेखन सराव घ्यावा)*


*सिमा चौधरी*
*जि.प.शाळा-वारनोळ*
*केंद्र-कोंढले*


🌺माझी शाळा माझे उपक्रम🌺
*~~~~~~~~~~~~~~~~~*
♏उपक्रम -- संख्याखेळ
 *आम्ही करतो संख्या तयार*.....
*=====================*
✅साहित्य -  *० ते ९ ची संख्यकार्ड* 

✅उद्देश् --- 
    👉🏾विद्यार्थ्यचे संख्याज्ञान पक्के करणे 
      👉🏾विद्यार्थ्यात संख्या तयार करण्याची चुरस निर्माण करणे
      👉🏾संख्येचे स्थान निश्चित करणे
    👉🏾खेळातून गणित शिकणे

✅कृती--

☘ *प्रथम विद्यार्थ्यांचे दोन गट तयार करावे  गटाना नावे देऊन फलकावर लिहावे*

☘ *0 ते ९ पर्यंतच्या संख्या कार्ड दोन्ही गटातील मुलांना द्यावे काही संख्यकार्ड डबल/ टिबल  देता येईल*.

☘ *समोर दोन मुले उभे ठेऊन शिक्षक एक संख्या उच्चारतील -जसे 542 तेव्हा दोन्ही गटातील ज्या मुलांजवळ हे संख्याकार्ड असतील ते तिन - तिन मुले धावत  जाऊन पुढे उभ्या असलेल्या मुलासमोर  ती संख्या तयार करतील*.

        ☘ *ज्या गटातील मुलांनी लवकर संख्या तयार केली त्या गटाला एक गुण द्यावे. अशाप्रकारे ज्या गटाला जास्त गुण मिळतील तो गट विजयी घोषित करण्यात येईल*.

             ☘ *हा खेळ इयत्ता १ ली पासून ८ पर्यन्त घेता येतो.वर्गाच्या पातळीनुसार दोन आंकी ते दहा अंकी पर्यन्त संख्या मुले खुप तत्परतेने करतात* .

☘ *हा खेळ घेताना मुलांसोबत मला ही खुप आनंद वाटला*.
मुलांची संख्या तयार करण्याची चढ़ाओढ़ पाहुन स्पर्धात्मक खेळ किती महत्वाचे असतात याची जाणीव झाली.

☘यातून मुलांना संख्या तयार करताना प्रत्येक अंकाचे स्थान किती महत्वाचे असते याचे महत्व पटले.मुलांनी या खेळातून मनसोक्त आनंद लुटला.
*====================*

No comments: