Sunday, 12 March 2017

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*एक पाऊल प्रगत शाळेच्या दिशेने....*

उपक्रमाचे नाव-: *बेरजेचे झाड*

सविस्तर उपक्रम:-

🌺इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना बेरीज हा घटक शिकवताना चित्रात दाखविल्याप्रमाणे  बेरजेचे झाड तयार केले.
🌺 सर्वप्रथम विद्यार्थ्यानी  दोन्ही फासे एकदम टाकायचे त्या  दोन्ही फास्यांवर जितके ठिपके असतील तितके मणी/ बिया/खडे/चिंचोके झाडावर ठेवायचे.

🌺सर्व मणी/ खडे/ बिया/ चिंचोके एकत्र करायचे व आलेले उत्तर झाडाच्या खोडावरील पट्टीत  शोधायचे.

🌺मुले हसत- खेळत *बेरीज* शिकतात.

🌺जास्त विद्यार्थी संख्या असेल तर गटात हा उपक्रम  आपण घेऊ शकतो.


🌺 अशाप्रकारे आपण  *वजाबाकी, गुणाकार* या घटकांचा देखील सराव घेऊ शकतो.


  *सिमा चौधरी*
  *जि.प. शाळा - वारनोळ*
  *केंद्र- कोंढले*
   *ता- वाडा*
    *जि. पालघर*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments: